
ठाणे : “युनिटी फॉर गुड… ग्रो टू सर्व्ह ” या घोषवाक्य अंतर्गत रोटरी क्लबया वतीने गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोग जागरूकता आणि लसीकरण शिबिर यशस्वीरित्या पार पडले. रोटरी क्लब ऑफ ठाणे वेस्ट, लायन्स क्लब ऑफ मुलुंड, लायन्स क्लब ऑफ ठाणे प्राईड आणि इनरव्हील क्लब ऑफ ठाणे वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील श्रीमती. सावित्रीदेवी थिराणी विद्यामंदिरात हा कार्यक्रम पार पडला. लायन्स युथ एम्पॉवरमेंट गव्हर्निंग कौन्सिलचे संचालक मोहित अग्रवाल यांनी त्यांच्या टीमसह अनेक मुलींना गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाबद्दल आणि लसीकरणाचे महत्त्व समजून सांगितले.
मोहित अग्रवाल म्हणाले की, भारतात गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि दरवर्षी सुमारे १ लाख महिला यामुळे मृत्युमुखी पडतात. या मोहिमेत २०० हून अधिक मुलींचे मोफत लसीकरण करण्यात आले. त्यांनी पालकांना सांगितले की ही लस उपचार नसून प्रतिबंध आहे आणि मुलींचे लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. सामान्य लोकांसाठी बाहेरून ही लस घेणे खर्चिक किंवा कठीण असते. शाळेतच ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शाळेने व या संस्थेने या उपक्रमासाठी जे सहकार्य केल्याचे सांगत पालक प्रभा कांबळे समाधान व्यक्त केले. तसेच पालकांनी लायन्स क्लब आणि इतर सर्व संस्थांचे मनापासून आभार मानले.