
ठाणे : उत्तर प्रदेश दिवसाच्या निमित्ताने यादव समाज ट्रस्ट ठाणे जिल्हा, द सोशल यूथ फाउंडेशन आणि आधार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जानेवारी २०२६ रोजी मराठा मंडळ हॉल, हरिनिवास, ठाणे येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला AU स्मॉल फायनान्स बँक व ट्रम्प ब्लड बँक यांनी मोलाचे सहकार्य केले.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तिन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यादव समाज ट्रस्ट ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष रामचंद्र यादव यांच्यासह संतोष यादव, रामानंद यादव, रमाशंकर यादव, रामदरश यादव, दिलीप यादव, दीपक यादव, प्रमोद यादव, हरिश्चंद्र यादव, संजय यादव, रवींद्र यादव (बच्ची), अरुण यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
द सोशल यूथ फाउंडेशनचे संस्थापक गजानंद यादव, अध्यक्ष प्रदीप यादव, तसेच आशुतोष यादव, अनुज सिंह, अक्षय खरवार, अमित जायसवाल, अवशेष निषाद यांनी सक्रिय सहभाग घेतला. आधार फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्याम पांडे, मुबारक शेख यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यादव समाज ट्रस्ट ठाणे जिल्ह्याचे रामानंद यादव यांनी नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले. द सोशल यूथ फाउंडेशनचे संस्थापक गजानंद यादव यांनी रक्तदानाचे महत्त्व स्पष्ट केले, तर आधार फाउंडेशनचे डॉ. श्याम पांडे यांनी उत्तर भारतीय समाजाला रक्तदानासाठी पुढे येण्याचे विशेष आवाहन केले. हा रक्तदान शिबिर सामाजिक एकोपा व मानवतेचा संदेश देणारा ठरला, अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.