
१८ % जीएसटी कमी झाल्यामुळे क्रिसमस सणाच्या आनंदात बहर..
ठाणे – यंदा गुरुवार 25 डिसेंबर रोजी ठाण्यात अनेक ठिकाणी आगळ्यावेगळ्या वस्तूंनी बाजारपेठ फुलून गेली आहे. त्यात ठाण्यातील बाजारापेठेत क्रिसमस सणासाठी अनेक ठिकाणी विविध प्रकारचे केक, सिक्रेट सांता चॉकलेट गिफ्ट हॅम्पर्स, चॉकलेट बुके, आदींचा साज नागरिकांसाठी उपलब्ध झाला आहे.
पाचपाखाडी येथे स्वीट काउंटी या केक शॉपमध्ये अनेक आगळ्यावेगळ्या रंगांचे, चवीचे आणि आकाराचे क्रिसमस केक बनवले आहेत. यात सांता स्ट्रॉबेरी चॉकलेट केक, पायनॅपल केक, सांता डीलाईट चॉकलेट केक, सिक्रेट सांता मॅजिक हॅम्पर बोक्स, बेन्टो केक, फॉलर फ्रुट केक, क्रिसमस ट्री प्लम केक, प्लम बार केक, कॉस्टमिज केक, चॉकलेट बुके अशा विविध प्रकाराची केक क्रिसमस सणासाठी उपलब्ध आहे. तसेच सिक्रेट सांता मॅजिक हॅम्पर बोक्स, क्रिसमस ट्री प्लम केक, बोंबिलीनो, प्लम बार केक, सिक्रेट सांता चॉकलेट बुके आणि इतर अनेक प्रकारचे भेट वस्तू उपलब्ध आहेत. तसेच या केकची किंमत ₹225 ते ₹799 पर्यंत ग्राहकांच्या मागणी प्रमाणे बनवून देण्यात येणार असून या आगळ्यावेगळ्या केकने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच यंदा केकवरील १८ % जीएसटी कमी झाल्यामुळे सर्व प्रॉडक्ट्सची कॉस्टिंग कमी झाली असल्याची माहिती महिला व्यवसायिक यांनी दिली.
प्लम केक – ₹ 175
सिक्रेट सांता चॉकलेट बुके – ₹ 600 (मोठा) – ₹245 (छोटा)
प्लम बार केक – ₹175
सांता स्ट्रॉबेरी चॉकलेट केक – ₹335
सांता डीलाईट चॉकलेट केक -₹335
पायनॅपल केक – ₹335
सिक्रेट सांता मॅजिक हॅम्पर बोक्स – ₹ 300