
ठाणे : श्री आनंद भारती समाजातर्फे ११५ व्या चंपाषष्ठी उत्सवानिमित्ताने आयोजित ट्रम्पेट एकल वादन स्पर्धेत १८ स्पर्धकांतून ख्यातनाम ट्रम्पेट वादक किशोर सोढा आणि त्यांच्या शिष्या उज्जाहिनी रॉय यांनी “जाने जा धुढंता फिर रहा” गाणे सादर करणाऱ्या एन्जेल बँड पथकातील १६ वर्षीय वादक गॅव्हिन गॅब्रियल मोबेन याची प्रथम क्रमांकाचा विजेता म्हणून निवड केली. यावेळी वादकांना मार्गदर्शन करताना किशोर सोढा म्हणाले, वाजवताना थोड फार इकडे तिकडे होत राहणारच आहे.पण तरीसुद्धा सूर, ताल आणि लय या त्रिसूत्रीवर लक्ष ठेवणे तेवढेच महत्वाचे आहे. आपल्या यशाबद्दल गॅव्हिन म्हणाला, मी आज १६ वर्षांचा आहे. गेली अनेक वर्षे बाबांच्या ऍंजल बँड पथकात वादनाचे धडे गिरवतोय . हौस म्हणून मी स्पर्धेत सहभागी झालो आणि यश मिळाले. हे यश मी बाबांना अर्पण करतो.
संस्थेचे अध्यक्ष हरेश्र्वर मोरेकर, माजी बँड कॅप्टन सुभाषचंद्र मोरेकर, ओमप्रकाश धिरोलिया, विनोद नाखवा, संदीप कोळी, नागेश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. बँक ऑफ इंडियाचा पुरस्कार मिळालेला या स्पर्धेचे सूत्रसंचालन ओंकार कोळी यांनी केले.
स्पर्धेचा निकाल : प्रथम क्रमांक – गॅव्हिन मोबेन ( जाने जा धुढंता फिर रहा), द्वितीय क्रमांक – महेंद्र भोईर (क्या हुआ तेरा वादा), तृतीय क्रमांक – देवानंद भोंगळे (आनेवाला पल). उत्तेजनार्थ – प्रथम : करण पाटील (तुम भी चलो). द्वितीय : ध्रुव हसमुख कोळी ( क्या यही प्यार है, स्पर्धेतील सर्वात युवा वादक, वय १५ वर्षे). स्पर्धेतील सर्वात जेष्ठ वादक – तुकाराम कोळी (वय वर्षे ८२).