
ठाणे : नितीन कंपनी येथील महादेव मंदिराच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यादव समाज ट्रस्ट ठाणे जिल्हा, महादेव चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवशंकर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला प्रभागातील ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी नगरसेविका सौ. काजोल किशोर गुणिजन तसेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री. किशोर गुणिजन यांची विशेष उपस्थिती लाभली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यादव समाज ट्रस्ट ठाणे जिल्हा व महादेव मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
ध्वजारोहणानंतर देशभक्तीपर भाषणे व जयघोषामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी यादव समाज ट्रस्ट ठाणे जिल्हाध्यक्ष रामचंद्र यादव यांच्यासह रामानंद यादव, रामदरश यादव, अशोक यादव, दिलीप यादव, संतोष यादव, विनोद यादव, दीपक यादव, दीपचंद यादव, त्रिलोकी यादव, हरिश्चंद्र यादव, प्रमोद यादव तसेच मनोरम नगर ब्लॉकमधील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.तसेच जिल्हा पदाधिकारी रामकोमल यादव, संजय यादव, ज्येष्ठ नागरिक रामवध यादव, संतोष यादव, जिलेदार कनोजिया, रामानंद कुशवाहा, सुनील विश्वकर्मा, जगमोहन प्रजापती, प्रदीप पांडे, बीरबल यादव, सतवीर यादव, दीपक यादव, श्यामदेव यादव, विशाल यादव, रमाशंकर यादव यांच्यासह असंख्य माता-भगिनींनीही या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. देशभक्तीपर वातावरणात पार पडलेल्या या ध्वजारोहण सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात राष्ट्रप्रेम आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.