
मुंबई, ता. २५ (आरती परब) : मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट – दादर येथे पार पडलेल्या द्विवार्षिक निवडणुकीत नॅशनल रेल्वे मजदुर युनियनने (एनआरएमयु) प्रचंड मताधिक्याने एकतर्फी विजय मिळवला. सहा संघटनांच्या महायुतीविरुद्ध लढत देत एनआरएमयुने भरघोस मतांनी बाजी मारत एकहाती सत्ता काबीज केली. या निवडणुकीत सिआएमएस, रेल कामगार सेना, महाराष्ट्र नवनिर्माण रेल कामगार सेना, रेल मजदुर युनियन आणि मध्य रेल कामगार संघ यांच्या महायुतीविरुद्ध एनआरएमयुने जोरदार लढत देत महायुक्तीलाही पराभूत केले.
एकूण मतदान — ९०४
एनआरएमयु पॅनल मत — ६९३
दादर इन्स्टिट्यूट एनआरएमयु मतमोजणी :
कॉम. चेतन सवाल, सचिव — 730
कॉम. विनय सावंत, खजिनदार — 714
सदस्य :कॉम. दिपक पाटील — 739
कॉम. प्रतिज्ञा सावंत — 733
कॉम. रॉयस्टन मायकल — 729
कॉम. प्रशांत पेडणेकर — 727
कॉम. विक्रम म्हात्रे — 725
कॉम. सिकंदरजीत सिंह – 723
कॉम. महेश खैरे — 720
मध्य रेल्वे दादर इन्स्टिट्यूट सोबतच नॅशनल रेल्वे मजदुर युनियनने कॅाम. वेणु पी. नायर (महामंत्री) यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा पराभव करत मध्य रेल्वेतील कुर्ला, ठाणे, कल्याण, इगतपुरी आणि लोणावळा या प्रमुख ठिकाणीसुद्धा एकछत्री सत्ता मिळवत जोरदार यश संपादन केले आहे. या ऐतिहासिक विजयामुळे मध्य रेल्वेमध्ये एनआरएमयुची पकड आणखी मजबूत झाल्याची प्रतिक्रिया रेल्वे कामगारवर्गातून व्यक्त केली जात आहे.