
दिवा, ता. २९ (आरती परब)– शिवसेना दिवा शहर गणेशपाडा शाखेत आयोजित दोन दिवसीय आधार कार्ड शिबिराच्या पहिल्याच दिवशी नागरिकांची मोठी गर्दी झाली. नाव, पत्ता, जन्मतारीख दुरुस्ती, मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे तसेच लहान मुलांची नवीन/नूतनीकरण आधार प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर करण्यात आली.
चरणदास म्हात्रे व दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या पुढाकाराने आणि शहर प्रमुख माजी महापौर रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरासाठी शाखा पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. नागरिकांनी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे सांगत शिवसेनेच्या कार्याचे कौतुक केले.