
निशांची मधील पहिले गाणे ‘डिअर कंट्री’ प्रदर्शित!तबल्याच्या ठेक्यांसह हार्मोनियमच्या सूरांनी केले मनात घरAmazon MGM Studios India आणि Zee Music यांनी आज त्यांच्या आगामी चित्रपट निशांची मधील पहिले गाणे डिअर कंट्री प्रदर्शित केले. हे गाणे प्रसिद्ध संगीतकार ध्रुव घाणेकर यांनी संगीतबद्ध केले असून, त्याला भावपूर्ण आवाज दिला आहे विजय लाल यादव यांनी आणि शब्द लिहिले आहेत प्यारेलाल देवनाथ यादव यांनी. डिअर कंट्री हे गाणे उत्तर भारतीय लोकसंगीताचा प्रभाव, खेळकर इंग्रजी ओळी, तबल्याच्या ठेक्यांसह हार्मोनियमच्या सूरांनी सजलेले आहे. नाचायला लावणाऱ्या ठेक्यांसह हे गाणं आपल्या मनात घर करतं आणि चित्रपटाच्या ‘देसी मसाला’ भावना उत्तमपणे उलगडते.
या गाण्याचे व्हिडिओ देखील तितकेच रंगीत आणि जोशपूर्ण आहे — चित्रपटातील काही निवडक दृश्यांतून तयार केलेली एक वेगवान मोंटाज, ज्यामध्ये उच्च-भावनात्मक प्रसंग, हलकीशी नोंक-झोंक आणि मुलांचं त्यांच्या आईसाठीचं प्रेम दिसून येतं. ‘डिअर कंट्री’ हे एक संगीतमय, हृदयस्पर्शी आणि खेडूत रंगांनी नटलेलं मातृभूमीला वाहिलेलं प्रेमपत्र आहे.
संगीतकार ध्रुव घाणेकर यांनी सांगितले, “हे गाणं ऐकताक्षणी प्रेक्षकांना खेड्यांचं वातावरण जाणवावं, ही कल्पना होती. पारंपरिक सूरांपासून सुरुवात करून, त्यात देसी इंग्रजी मिसळली — जशी लहान गावांमधली लोकं बोलतात, अगदी मनातून. मला चित्रपटाच्या वेडसर आणि प्रेमळ कथानकाला जुळणं गरजेचं वाटलं. अनुराग कश्यप यांच्या चित्रपटांना खास साउंडट्रॅक असतोच, त्यामुळे मला काहीतरी वेगळं करायचं होतं – आणि *डिअर कंट्री* तसंच झालं – मजेशीर, आगळंवेगळं, मुळांशी जोडलेलं.”
निशांची हा चित्रपट अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केला असून, अजय राय आणि रंजन सिंग यांनी Jar Pictures अंतर्गत आणि Flip Films सहनिर्मित केला आहे. कथा प्रसून मिश्रा, रंजन चंदेल आणि अनुराग कश्यप यांनी लिहिलेली आहे.
या चित्रपटात ऐश्वर्य ठाकरे यांचे दमदार रोल मधून अभिनयक्षेत्रात पदार्पण होत आहे. त्यांच्या सोबत वेदीका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद झीशान अय्युब आणि कुमुद मिश्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. निशांची दोन भाऊ आणि त्यांच्या टोकाच्या जीवनप्रवासाची कहाणी सांगतो – जिथे त्यांच्या निर्णयांचा परिणाम त्यांच्या नशिबावर कसा होतो हे पाहायला मिळेल. हा चित्रपट संपूर्ण भारतात १९ सप्टेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.