
ठाणे – ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर संप येथे केंद्र शासनाच्या अमृत २.० पॅकेज २ अंतर्गत जुन्या संपचे तोडकाम करून त्या ठिकाणी नवीन संप व जलकुंभ बांधण्याच्या कामाकरीता जुन्या संप मधील पंपाचे पॅनल शिफ्टींगचे काम करणे आवश्यक असल्याने मंगळवार, दि.०७/१०/२०२५ रोजी सकाळी ९:०० ते बुधवार, दि.०८/१०/२०२५ रोजी सकाळी ९:०० वाजे पर्यंत एकूण २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिके अंतर्गत इंदिरानगर जलकुंभ, श्रीनगर जलकुंभ, वारलीपाडा जलकुंभ, कैलासनगर रेनो टैंक, रूपादेवी जलकुंभ, रूपादेवी रेनो टैंक, रामनगर जलकुंभ, येऊर एअर फोर्स जलकुंभ, लोकमान्य जलकुंभ अंतर्गत परिसर इत्यादी भागाचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी पूर्ण पणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
Please follow and like us: